मराठवाड्यात आतापर्यंत १४० मि.मी. पाऊस; सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात; हिंगोली,नांदेड जिल्ह्याला अजूनही प्रतीक्षा

Foto
औरंगाबाद: मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी गेल्या आठवडाभरात औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात झाला असून, त्यापाठोपाठ परभणी व् लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला तर हिंगोली आणि नांदेड जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मराठवाड्याची वार्षिक सरासरी 779 मि.मी. एवढी आहे. आतापर्यंत अवघा 140 मि.मी. पाऊस बरसला. औरंगाबाद जिल्ह्यावर सध्या तरी आभाळमाया असून आतापर्यंत सरासरीच्या 63 टक्के पाऊस या जिल्ह्यात झालेल्या झाला आहे. परभणी व लातूर जल्ह्यात 53 टक्के,  उस्मानाबाद 52, बीड 49 नांदेड 37 तर हिंगोली जिल्ह्यात अवघा 31 टक्के पाऊस झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक 130 मिमी पाऊस पडला तर सिल्लोड तालुक्यात 112 मिमी पाऊस झाला आहे. त्याखालोखाल वैजापूर 92, औरंगाबाद 82, सोयगाव 79, गंगापूर 75, कन्नड 56, खुलताबाद 52 तर सर्वात कमी पाऊस सर्वात कमी अवघा 38 मिमी पाऊस पैठण तालुक्यात झाला आहे.

मराठवाड्यात निम्माच पाऊस
 मराठवाड्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. हिंगोली, नांदेड यासह लातूर, परभणी, जालना, उस्मानाबाद, बीड हे जिल्हे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात केवळ दोनच तालुक्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला. पैठण, खुलताबाद, कन्नड हे तालुके अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यात आजपर्यंत सरासरीच्या 48 टक्के पाऊस झाला आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker